नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांनी गावच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे- माजी मंत्री बबनराव लोणीकर, मतदार संघातील 78 ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात


परतूर( प्रतिनिधी )ग्रामपंचायत चा सरपंच हा त्या गावच्या विकासाचा आरसा असून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावाच्या विकासासाठी स्वताला झोकून देऊन काम करावी असे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते परतुर येथे संपन्न झालेल्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी उपाध्यक्ष तथा भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर भाजपाचे ज्येष्ठ नेते मदनलाल शिंगी मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप गोरे भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश राव निरवळ जालना तालुका अध्यक्ष प्रकाश राव टकले विलासराव आकात परतूर पंचायत समितीचे सभापती रंगनाथ येवले उपसभापती रामप्रसाद थोरात, जिल्हा परिषद सदस्य पंजाब राजेश मोरे, अंकुशराव बोबडे माऊली शेजुळ बद्रीनारायण खवणे बद्रीनारायण ढवळे बोराडे कैलास बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना माजी मंत्री लोणीकर म्हणाले की मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी वर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी सरपंच उपसरपंच त्याबरोबरच आपल्या सर्वांचे असल्याची ते म्हणाले परतूर विधानसभा मतदार संघामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण मंत्री असताना 6 हजार 700 कोटी रुपयांची विकासकामे केली त्याचा परिणाम म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने सव्वा लाखापेक्षा जास्त मतदान करून मला निवडून दिले त्याच शिदोरीवर मतदार संघातील शंभर पैकी 78 ग्रामपंचायती जनतेने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिले असल्याचे लोणीकर यांनी यावेळी सांगितले जनसामान्य माणसाच्या विकासासाठी गेल्या 35 वर्षापासून आपण सदैव अवकात कार्यरत असून येणाऱ्या काळात ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले
=======================
*वीज वितरण कंपनी विरोधात केलेल्या आंदोलनाला यश*
======================
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली नेर तालुका जालना येथे वीज वितरण कंपनी विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाला यश आले असून वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कापण्याची मोहीम थांबवली आहे
मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन येत्या दोन दिवसात जोडून द्या अशाप्रकारचा अल्टिमेटम वीज वितरण कंपनीला माजी मंत्री लोणीकर यांनी दिला असून या संदर्भामध्ये अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असल्याचे लोणीकर यांनी सांगितले असून येत्या दोन दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे अशा शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तात्काळ जोडून द्या असे बजावले असल्याची लोणीकर यांनी यावेळी सांगितले
====================
   *आमदार लोणीकर यांच्या विकास कामामुळे मतदारसंघाचे भाग्य पलटले राहुल लोणीकर*
=====================
माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकास कामाच्या शिदोरीवर मतदारसंघाचे भाग्य पालटले असून त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदार संघातील 80 टक्के ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आले असल्याची युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी सांगितले पुढे बोलताना राहुल म्हणाले की विकास हा लोणीकर यांचा स्थायीभाव असून लोणीकर यांच्या आदर्शावर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी आपल्या गावच्या विकासासाठी जीव ओतून काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले
  या वेळी परतूर तालुक्यातील सातोना खु,सातोंना बु, वाटूर,आंबा, बाबई, मसला, डोलारा,अकोली, शेलगाव ब्राह्मणवाडी परतवाडी सावरगाव बुद्रुक बानाची वाडी आसनगाव
 ढोनवाडी,सुरुमगाव,हनवडी,लिखित पिंपरी, वलखेड, नांद्रा, सातारा वाहेगाव, पिंपळी धामणगाव, माव,श्रीधर जवळा, वैजोडा, वाहेगाव सातारा, पांडे पोखरी, रायपूर,संकनपुरी,
 तर मंठा तालुक्यातील पाटोदा बोराडे सोनूनकर वाडी ,पिंपर खेडा,दुधा,अंभोरा जहागीर, पांगरी बु खोराड सावंगी देवठाणा ऊस्वद जयपुर शिवनगिरी, हिवरखेडा, पळस खेडा, बेलोरा, पांगरी ख, वडगाव केहाळ, माळकिनी,वाटू र तांडा,सावरगाव वायाळ, ढोकसाळ, वझर सरकटे, आरडा तोलाजी, वाघोडा, वरुड,माळेगाव, विरगव्हाण लिंबोना कानडी पेवा विडोळी खू पोखरी टकले पांगरा गडदे किरला हनवत खेडा विडोळी बुद्रुक आंबोडा कदम
तर जालना तालुक्यातील शेवली उखळी काकडा राठोड नगर कोळवाडी दरेगाव धोंडी पिंपळगाव शंभू सावरगाव शिवनी बोरगाव ढगी चितळी पुतळी हस्ते पिंपळगाव निपाणी पोखरी आदी ग्रामपंचायत च्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य, नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....