सर्वसामान्यांना दिलासा देत आत्मनिर्भर भारत घडवणारा अर्थसंकल्प -भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची प्रतिक्रिया


जालना(प्रतीनीधी) कोरोनाच्या महासाथीमुळे संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्वच घटकांना दिलासा देत आत्मनिर्भर भारत घडवणारा अर्थसंकल्प माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात अर्थ मंत्री निर्मला सीतारामन जी यांनी मांडला असून नक्कीच प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती या अर्थसंकल्पाचे स्वागत करेल अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे 

कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शेतकरी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी अर्थसंकल्पात बारकाईने विचार करण्यात आला आहे. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीची तरतूद 30,000 कोटींवरून वाढवून 40,000 कोटी रुपये केली आहे. सूक्ष्म सिंचनासाठीची तरतूद दुप्पट केली आहे. शेतीसाठीच्या कर्जपुरवठ्याची मर्यादा वाढवून साडेसोळा लाख कोटी रुपये केली आहे. ग्रामीण भागातील प्रॉपर्टीची मालकी स्पष्ट करणारी स्वामित्व योजना देशभर लागू केली आहे. पिकांच्या बाबतीत मूल्यवर्धन व निर्यातीसाठीची ‘ऑपरेशन ग्रीन स्कीम’ योजनेचा विस्तार करून ती आता 22 पिकांना लागू केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पायाभूत सुविधांमध्ये वाढ करता यावी यासाठी कृषी पायाभूत सुविधा निधी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय अर्थसंकल्पात जाहीर केला आहे. शेतकऱ्यांसोबतच अनुसूचित जाती – जमाती अशा सर्व घटकांचा या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे.

सर्वसामान्य व्यक्तीच्या  हिताला केंद्रबिंदू ठरवून निर्मल भारत घडवण्यासाठी मानण्यात आलेला हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मांडला असून त्याबद्दल मा. मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आपण अभिनंदन करतो आणि आभार मानतो अशी प्रतिक्रिया भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना व्यक्त केली.
यावेळी लोणीकर म्हणाले की, कुराणाचे महाभयानक संकट  या देशावर आले असताना व सर्वत्र कोणाचा हाहाकार माजलेला असताना  अनेक लोकांचे आरोग्य कोरोनाच्या संकटामुळे धोक्यात आले आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अर्थसंकल्पात आरोग्यासाठी भरभक्कम तरतूद केली आहे. आरोग्याबरोबरच  शेती सुधारणेबाबत देखील या अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने उचललेली  पावले  खरोखरच प्रशंसनीय असून  या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नक्कीच  भारत आत्मनिर्भर बनेल  असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले 

देशाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून वेगाने बाहेर पडून आर्थिक विकास होण्यासाठी मदत होईल या बाबत  या अर्थसंकल्पात विचार केला आहे. देशातील पायाभूत सुविधांच्या विकासावर अर्थसंकल्पात भर दिला आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व घटकांना दिलासा मिळणार आहे. 
शेती सुधारणे सोबतच  तरुणांना रोजगार दळणवळणाच्या सुविधा यासाठीदेखील केंद्र सरकारने चांगली आर्थिक तरतूद केल्याचे त्यांनी स्वागत केले.

लोणीकर पुढे म्हणाले की, लघू उद्योगांना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद केली आहे. त्यामुळे रोजगारनिर्मितीला अधिक चालना मिळेल. पंचाहत्तरपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना आयकर रिटर्न भरण्यापासून सवलत देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या विविध तरतुदींमुळे मध्यमवर्गीयांना विशेष दिलासा मिळेल.

लोणीकर पुढे म्हणाले की, गहू, तांदूळ, डाळी, कापूस यांच्या खरेदीसाठी मोदी सरकारने किती मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला याची सविस्तर आकडेवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सविस्तरपणे दिली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून धान्य खरेदीबाबत मोदी सरकार किती चांगल्या रितीने काम करत आहे. 

एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांच्या हिताचा व भारताला आत्मनिर्भर बनवणारा आहे पुनश्च एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून अभिनंदन करतो व आभार मानतो

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड