बहुचर्चितआंबा ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात,माजी मंत्री बबनराव लोणीकर व राहुल भैय्या लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली खाली करणार विकास:- प्रशांत बोनगे
परतूर (प्रतिनधी) तालुक्यातील बहुचर्चित आंबा ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यात भाजपा ला यश आले असून सरपंचपदी मेराज खतीब तर उपसरपंच पदी उमा महादेव वीर यांची निवड झाली असून माजी मंत्री बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेत्रत्वाखाली आंबा गावाला विकसित करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रशांत बोनगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे
पुढे या पत्रकात म्हंटले आहे की,काहींनी आंबा ग्रामपंचायत भाजपा च्या ताब्यात येऊ नये यासाठी देव पाण्यात ठेऊन ग्रामपंचायत भाजपा च्या हातून गेल्याचे विविध माध्यमा द्वारे प्रसिद्ध केले होते मात्र कुठल्याही गोष्टीची शहानिशा न करता भाष्य करणाऱ्या साठी ही मोठी चपराक असल्याचे बोनगे यांनी म्हंटले आहे
पुढे या पत्रकात म्हंटले आहे की , आंबा गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी सरपंच मेराज खतीब व उपसरपंच उमा वीर सह आम्ही सर्वजण पूर्ण प्रयत्न करणार असून आमचे नेते माजी मंत्री बबनराव लोणीकर व प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या माध्यमातून विविध विकास कामांना राबवण्याचा संकल्प पॅनल प्रमुख प्रशांत बोनगे यांनी पत्रकात नमूद केला आहे
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच मेराज खतीब, उपसरपंच उमा महादेव वीर,उद्धव बोनगे,सुनील बोनगे,दत्ता आढाव,राहुल भदर्गे,राजेश कोरडे, के डी भदर्गे,बेग सर,गणेश बोनगे,सोनू खतीब यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले