कोरोनाची भीती सर्व सामान्य लोकांनाच का? मनसे विद्यार्थी सेनेचे सिद्धेश्वर काकडे
कोरोना ची भीती दाखवत राज्य सरकार महाराष्ट्रात सध्या सर्व सामान्य जनतेला वेठीस धरून राजकारण करीत आसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी केला आहे. पुजा चव्हाण मृत्यु प्रकरणी आपण गुन्हेगार नाही हे सिध्द करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार मधील मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी संस्थानाचा आधार घेत शक्ति प्रदर्शन करून सर्व सामाण्यांच्या भावना दुखावल्या आसल्याचे मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांनी म्हटले आहे. वाशीम जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांना सस्पेंड केलं पाहिजे व मंत्री संजय राठोड यांच्यावर देखील कार्यवाही करायलाच पाहीजे आशि मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना च्या वतीने मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना लेखी पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे हे कोरोनाचे नियम पाळावे आसे अहवान करतात आणि दुसरीकडे त्यांचेच मंत्री नियम तोडतात हे मनसे खपवुन घेणार नसल्याचे सिध्देश्वर काकडे यांनी सांगितले आहे.