मतदार संघातील कामे मार्च पुर्वी पुर्ण करा,डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रूरबन योजनेतील कामा वरूण अधिकाऱ्यांना धरले धारेवर


परतुर (प्रतिनिधी) मतदार संघातील विकास कामे मार्च पुर्वी पुर्ण करा नसता कामचुकार पणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी परतुर येथे तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिला.
     या वेळी बबनराव लोणीकर यांनी डॉ. शामप्रसाद रूरबन योजनेत महाराष्ट्रातील केवळ 7 जिल्ह्यातील क्लस्टर चा सामावेश आहे  मोदी सरकारने केला त्यामध्ये आष्टी व परिसरातील 16 गावातील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 3 कोटी 25 लक्ष  रुपयांचा निधी दिला रुपयांचा निधी दिला या क्लस्टर मधील शाळाखोल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय सुशोभिकरण, आष्टी शहरातील अंगणवाडी बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन, शहरांतर्गत सिमेंट रस्ते, वीज वितरण कंपनीचे खांब बदलून बंच केबल टाकण्याची कामे त्याच बरोबर या क्‍लस्टर मधील अंगणवाडी इमारतीची कामे त्वरेने पूर्ण करा असे ठनकावतानाच विलंबास कारणीभूत ठरणार्‍या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले
================================
*वीजवितरणच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर*
 परतुर शहर व आष्टी शहरातील बंच केबल साठी व पोल बदलण्यासाठी निधी दिला तात्कालीन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी 10 केव्ही 15 केव्ही  रोहित्रासाठी उपलब्ध झाला होता त्या पार्श्‍वभूमीवर परतूर शहरातील व आष्टी शहरातील जीर्ण झालेले विजेचे खांब बदलून विज चोरी थांबावी म्हणून बंच केबल मंजूर झाली ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करताना जीर्ण जुनाट झालेल्या लोंबकाळ तारा काढण्यात वीजवितरण दिरंगाई करीत असल्या कारणावरून तीव्र नापसंती दर्शवली
       शेतकऱ्यांच्या हितासाठी असणारे 15 केव्ही 25 केव्ही  ची प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढून मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून द्या असेही माजी मंत्री लोणीकर यांनी सांगितले
==================================
*कामात विलंब करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा*
 मतदार संघाच्या विकासासाठी आपण पालकमंत्री असताना 6 हजार 700  कोटी रुपयांचा निधी आणला होता हे सांगताना मतदार संघातील विकास कामांचा खोडा घालणाऱ्या कामाला  विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना नोटीस द्या ब्लॅक लिस्ट करा नसता मला पुढचे पाऊल उचलावे लागेल असेही माजी मंत्री लोणीकर यांनी सांगितले
=================================
*निम्न दुधना तील कामावरून कार्यकारी  विचारला जाब अभियंत्यांना विचारला जाब*
 निम्न दुधना प्रकल्पांतर्गत परतूर मंठा तालुक्यातील 21 गावे बुडीत क्षेत्रात गेली त्या गावातील पायाभूत सुविधा शेतकऱ्यांच्या शेती पोत रस्त्यांच्या  उशीर झालेल्या कामासंदर्भात  निम्न दुधना  चे कार्यकारी अभियंता यांना धारेवर धरत उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या
=================================
*एस.टी. महामंडळाला मतदारसंघातील ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याच्या दिलेल्या सूचना*
 मतदार संघातील बहुतेक रस्त्यांची कामे पूर्ण झालेली असून एस.टी महामंडळाने 'बहुजन हिताय बहुजन सुखाय'   हे ब्रीद अमलात आणत ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एस.टी चा वापर ग्रामीण भागातील जनतेला व्हावा यासाठी मतदारसंघातील गावांमध्ये बसेस सुरू करण्याच्या सूचना डेपो मॅनेजर यांना देतानाच आष्टी बसस्थानकातील सुविधा संदर्भात लक्ष देण्याची सांगितले
===================================
*पंतप्रधान आवास योजना रमाई घरकुल योजना शबरी योजनेतील कामे गतीने पूर्ण करा*
 पंतप्रधान आवास योजना तसेच रमाई घरकुल योजने बरोबरच  शबरी योजनेतील घरकुलांच्या लाभार्थ्यांचे कामे त्वरेने पूर्ण करून द्या गरिबांच्या आयुष्यात निवारा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्या असे सांगतानाच रंजल्या-गांजल्या यांच्या सेवेसाठी कुठलीही आहे गये करू नका असेही माजी मंत्री लोणीकर यांनी सांगितले
===================================
*शेगाव पंढरपुर दिंडी मार्गावरील उर्वरित कामाला गतीने पूर्ण करा*
 केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करीत शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग आपण मंजूर करून घेत हा ड्रीम प्रोजेक्ट मतदार संघात आणला या रस्त्यावरील अनेक ठिकाणचे काम बाकी असून ते पूर्ण करुन घेण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता  यांना यावेळी आमदार लोणीकर यांनी दिली
===================================
*कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार घेऊन विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी तत्परता दाखवावी*
 कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी शेततळे सामूहिक शेतमळे ठिबक सिंचन व पोखरा अंतर्गत  करता येणार्‍या सर्व लाभ शेतकऱ्यांना देण्यासाठी तत्परता दाखवावी असेही ते म्हणाले
===================================
*परतुर शहरातील भूमिगत गटार योजना स्वच्छता आदी प्रश्नावर मुख्याधिकारी यांना लक्ष देण्याच्या दिल्या सूचना*
शहरातील जागोजागी तुंबलेली गटारे नाले व भूमिगत गटार योजनेच्या कामावरून मुख्याधिकाऱ्यांना गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असून नगरपालिकेने या कामात पुढाकार घेऊन शहरवासीयांचे आरोग्य सांभाळावे अशी माजी मंत्री आमदार लोणीकर यांनी सांगितले
===================================
*मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची उर्वरित कामे पूर्ण करा*
 मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील मतदारसंघातील कामे दर्जा राखून पूर्ण करा असे सांगतानाच येणाऱ्या चालू आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील 25 कोटी रुपये किमतीच्या  कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना प्रारंभ करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांना दिल्या
===================================
*30 मार्च पूर्वी नाट्यगृहाची इमारत पूर्ण करा*
 परतूर शहरातील क्रीडा संकुल, मागासवर्गीय मुलींचे वस्तीग्रह स्मशानभूमी विकासाची कामे त्याचबरोबर शहरासाठी वैभव ठरणाऱ्या संस्कृतीत चळवळीला चालना  देण्यासाठी बांधण्यात येणार्‍या नाट्यगृहाचे काम तीस मार्चपूर्वी करण्याच्या सूचना माजीमंत्री लोणीकर यांनी दिल्या

           चार तास चाललेल्या बैठकीत माजीमंत्री लोणीकर यांनी सखोल आढावा घेतला 
           यावेळी  युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सवडे, प्रकल्प संचालक क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, निम्न दुधना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, देशपांडे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता राठोड, मजीप्रा चे कार्यकारी अभियंता  रबडे, तहसीलदार रूपा चित्रक, मदनलाल शिंगी, पंचायत समिती सभापती रंगनाथ येवले,  तालुका अध्यक्ष रमेश भापकर, पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले, गटविकास अधिकारी गुंजकर, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख अभियंते यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.