औरंगाबाद 11 मार्च पासून मिनी लॉक डाऊन

 औरंगाबाद (प्रतीनीधी) – गेल्या दोन दिवसांपासून लॉकडाऊनच्या चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती. आता त्याबाबत अधिकृत निर्णय जाहीर झाला आहे. येत्या ११ मार्च पासून ते ४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन असणार आहे. तर प्रत्येक शनिवार व रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे, अशी घोषणा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तसेच या कालावधीमध्ये रुग्णसंख्या अधिक वाढली तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे देखील चव्हाण म्हणाले. या अंशतः लॉकडाऊन मध्ये धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, आंदोलन, सामाजिक कार्यक्रम, आठवडी बाजार, जलतरण तलाव, क्रीडा मैदाने (मात्र सरावासाठी चालू असतील), शाळा, महाविद्यालये पूर्णतः बंद असतील. यात महत्वाचे म्हणजे मंगल कार्यालय, सभागृह यात होणारे सर्व लग्न समारंभांना परवानगी नाकारण्यात आली आहे. शनिवार व रविवारच्या लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय सेवा, मीडिया ऑफिस, दूध विक्री, भाजीपाला, फळविक्री सुरू राहील. १५ दिवसांनी कोरोना टेस्ट बंधनकारक खाजगी व कंपनीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. त्या संबंधीचे प्रमाणपत्र सर्वांनी सोबत बाळगावे, असे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत