अनाथ मुलांच्या हस्ते केक कापून लोणीकर यांनी केला आहे वाढदिवस साजरा,कोरोना पार्श्वभूमीवर साधेपणाने वाढदिवस साजरा
औरंगाबाद(प्रतीनीधी)
कोरोना पार्श्वभूमीवर जास्त गर्दी न जन्मता अत्यंत साधेपणाने वाढदिवस साजरा करण्यात यावा अशा सूचना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केल्या होत्या त्यानुसार आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वतः लोणीकर यांनी औरंगाबाद येथे अनाथ मुलांच्या हस्ते केक कापून अगदी साधेपणाने आपला वाढदिवस साजरा केला
औरंगाबाद येथील भगवान बाबा बालिका
आश्रमात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमाला ॲड.विरेंद्र देशमुख, सभापती शिवहरी खिस्ते, किशोर यादव, पालवे आणि संस्थेच्या संचालिका कविता ताई वाघ उपस्थित होते. यावेळी ॲड.विरेंद्र देशमुख आणि संचालिका कविता ताई वाघ यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच याप्रसंगी आदरणीय बबनराव लोणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने काम करावे यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केली. अगदी आनंदी वातावरणात लोणीकरांच्या वाढदिवसाचा केक अनाथ मुलांच्या हस्ते कापण्यात आला.
भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोज पांगारकर यांच्या हस्ते लोणीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भगवान बाबा बालिका आश्रम मध्ये अनाथ मुलींना कपडे वाटप करण्यात आले.