युवकांनी आत्मनिर्भर च्या माध्यमातून सक्षम व्हावे* *प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,युवकांनी समर्पित भावनेने काम करावे ; - हर्षल जी विभांडीक,*परतूर येथे युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न*
===================
परतूर (प्रतिनधी) युवमोर्चा कार्यकर्त्यांनी आत्मनिर्भर भारत योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना देण्यासाठी पुढाकार घेऊन काम केल्यास खऱ्या अर्थाने बेरोजगार युवक युवतींना आत्मनिर्भर बनवता येईल त्या साठी युवा मोर्चा ने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले
ते परतूर येथे युवमोर्चा च्या संघटनात्मक बैठकीत बोलत होते
या वेळी व्यासपीठावर हर्षल जी विभांडीक(संयोजक, आत्मनिर्भर भारत), हर्षवर्धन कराड(जिल्हा प्रभारी) भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर,जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, ता अध्यक्ष शत्रुघन कणसे अविनाश राठोड विक्रम उफाड योगेश ढोणे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियल वाले संपत टकले तुकाराम सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी आत्मनिर्भर भारत च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी युवा युवती यांना विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम करावे असेही ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले की युवा वारियर्स युवा मोर्चा ची संकल्पना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असून युवा वारियर च्या माध्यमातून 18 ते 24 वयोगटातील युवकांना भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्या बरोबरच वॉरियर्स मध्ये असलेली सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचेही ते म्हणाले
या वेळी हर्षलजी विभांडीक म्हणाले की, प्रत्येक युवकांच्या हाताला काम मिळुवून देण्यासाठी आत्मनिर्भर भारत ही योजना फलदायी असून योजनेच्या माध्यमातून युवक युवतींना स्वयंपूर्ण होण्याची संधी असल्याचे सांगतानाच या साठी युवकांनी विधायक प्रयत्न करणे गरजे असून विविध योजना संदर्भात त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले
या वेळी हर्षवर्धन कराड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस या सह जिह्यातील पदाधिकारी उपस्थतीत होते