राज्य शासनाच्या आदेशाची वाट न पाहता प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत,अवकाळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यात शेतीचे प्रचंड नुकसान,राज्यसरकार कुंभकर्णा सारखे झोपेत -आमदार बबनराव लोणीकर यांचा घणाघात
प्रतिनिधी(जालना)
मराठवाड्यात गेल्या चार दिवसात गारपिट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पार्शवभूमीवर राज्य शासन आदेशाची प्रशासन वाट पाहत आहे कि सरकार पंचनामे करण्याचे आदेश देईल, परंतु राज्य सरकार आपल्या गैरकारभरात गुंतले आहेत बलात्कार, खून, खंडणी अश्या वेगवेगळ्या प्रकरणात राज्यसरकार चे दररोज धिंडवडे निघत आहेत.
अश्या परिस्थिती राज्य सरकार कुंभकर्णासारखे झोपले आहे शासन मदत करणार नाहीच परंतु प्रशासनाने वेळ न दवडता राज्यसरकार च्या आदेशाची वाट न पाहता तात्काळ मराठवाड्यात झालेल्या शेती च्या नुकसानीचे पंचनामे करावेत व शासन दरबारी अहवाल पाठवावा.
आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना पत्रा द्वारे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी मागणी केली आहे.
चार दिवस उलटून देखील अवकाळी पावसाने, गारपिट ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत ज्यावेळी राज्य सरकार आदेश देत नसेल त्यावेळी पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी यांना अधिकार असतात त्यांनी सदर नुकसानीचे पंचनामे करून अहवाल राज्य शासनास पाठवावा असे पत्र आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले.