शितला माता पूजनामध्ये मारवाडी समाजाने दक्षता घ्यावी-विकासकुमार बागडी


जालना : गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा साजरी होत असलेल्या शितला माता पूजेच्यावेळी मारवाडी समाजाने शासकीय नियम पाळून हा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, मारवाडी समाजामध्ये शितला माता पुजनाला अनन्य साधारण असे महत्व आहे. हा उत्सव वर्षातून एकदाच साजरा होतो परंतू कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर हा उत्सव साजरा करतांना अत्यंत खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याचे कारण असे की, या उत्सवानिमित्त समाजातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती हा शितला मातेचे दर्शन या दिवशी घेतच असतो. यंदा हा उत्सव सोमवार दि. २९ मार्च २०२१ रोजी येत असून शहरात शितला मातेचे केवळ काद्राबादेतच एकमेव मंदिर असल्यामुळे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. परंतू यावर्षी गर्दी करता येणार नाही, याची खबरदारी मारवाडी समाजातील प्रत्येक कुटुंबियांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी घ्यावी. दर्शनास येतांना मास्कचा वापर जरुर करावा, सॅनिटायझर हाताला लावावे आणि सुरक्षित अंतरावर राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, याशिवाय शुगर, बीपी, दमा आणि अन्य प्रकारच्या आजाराने ग्रासलेल्यांनी घरुनच दर्शन घ्यावे, असे आवाहन करुन श्री. बागडी यांनी शितला माता मंदिराचे नगर परिषदेच्यावतीने दोन वेळा सॅनिटायझर फवारणी करुन द्यावी, अशी मागणीही श्री. बागडी यांनी केली आहे.

        


Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड