१२ दिवसात सायकलवरुन प्रवास करत रायगडावर शिवरायांना करणार अभिवादन नागपूर येथील "धाडस" ग्रुपचा अभिनव उपक्रम


प्रतिनिधी
स्त्री सशक्तिकरण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दलची स्वामीनिष्ठा, झाडे लावा झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा, हागणदारी मुक्त गाव, शिवरायांच्या विचारांचा अनमोल ठेवा जपणे, नैसर्गिक साधन संपत्तीची बचत, शिवरायांच्या गडकिल्ल्यावर बद्दलची जनजागृती आणि प्रदूषणाला आळा बसवणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागपूर येथील "धाडस" ग्रुप च्या वतीने नागपूर ते रायगड शिवरायांना तिथीप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला अभिवादन करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले 20 मार्च रोजी निघालेली ही रॅली 31 मार्च रोजी रायगडावर पोहोचणार आहे

12 दिवसात 780 किलोमीटरचा पल्ला गाठत रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन करण्यासाठी सायकल वर जाण्याचं धाडस तरुण तरुणींनी केलं आहे 24 मार्च रोजी मुक्काम जालना येथे होता 18 ते 24 वयोगटातील वर्षा घाटोळे, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, निहारिका लांडगे, सुमित शरणागत, अविनाश कटरे, शुभम मुंडले, निशांत निंदेकर, अनिरुद्ध सोलाट, शरद आमगावकर, राज मुन्ने या 12 युवक-युवतींचा समावेश आहे

जालना येथे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या वतीने जालना येथे शासकीय विश्रामगृहात सदरील सायकल रॅलीचे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करत या सर्व शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रा. सहदेव मोरे पाटील, सुनील शिवनगिरीकर, किशोर कद्रे, गणेश सोळंके, अश्विनी आंधळे, रामा खाडे, सचिन गाडे, पंकज कुलकर्णी, पुष्कर कदम यांच्यासह भाजपायुमो व राहुल लोणीकर मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले