जालना जिल्हा शिवसंग्रामची कार्यकारणी बरखास्त... तानाजीराव शिंदे प्रदेश अध्यक्ष,जिह्यातील जेष्ठ नेते व कार्यकर्त्याशी वीचार वीनीमय करून नवीन कार्यकारणि निवडावी-सचिन खरात
परतुर- जालना जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी सोबत बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर जालना जिल्यातील शिवसंग्रामची जिल्हा कार्यकारिणी सोबतच युवक, महिला, विद्यार्थी, कामगार, किसान, अल्पसंख्याक व सामाजिक न्याय आघाडीसोबत,जिल्ह्यातील सर्व आधाइया आणि सेलच्या जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणी काल दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी आमदार विनायकराव मेटे साहेब यांच्या आदेशाने बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
आगामी काळामध्ये संघटना वाढीसाठी व येणाऱ्या काळातील
निवडणुका,महानगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समिती या लक्षात घेऊन जे संघटना वाढीसाठी योगदान देतील अशा सक्षम कार्यकर्त्यांच्या निवडी लवकरच जिल्ह्यातील सर्व नेते, कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करून जाहीर केल्या जाव्यात अशी विनंती वीद्यार्थी संघटनेचे माजी तालूकाध्यक्ष सचिन खरात परतुर यांनी केले आहे