शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून सम्राट अशोक मित्र मंडळ व ऑल इंडीया पॅथर सेनेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यांचीं साजरी
परतूर(प्रतीनीधी) येथील तहसील कार्यालया समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजीत पुतळ्याच्या जागेवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाचा पालन करुन सम्राट अशोक मित्र मंडळ व ऑल इंडिया पॅंथर सेना यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली
याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागी सर्वात अगोदर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर बुद्ध वंदना घेऊन माजी समाज कल्याण सभापती शहाजी राक्षे, सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष हिवाळे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शामसुंदर चितोडा,ऑल इंडीया पॅथर सेनेचे ता.अध्यक्ष आर्या कांबळे,प्रवीण प्रधान,राहूल गणकवार,सुमित भंडारी,रवी मानकर,अर्जुन राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
या कार्यक्रमात बुद्ध वंदना राहूल खंडागळे यांनि गायली कार्यक्रम यशस्वीते साठी सुनिल पाडेवार,सतीश हीवाळे,नरेंद्र कांबळे,सुनिल पाईकराव,पै.अकाश राक्षे,शुभम पाईकराव,ऋषिकेश नवघरे,चन्दर मस्के,वीठ्ठल कांबळे,दामू आदीनी परीश्रम घेतले