परतूर येथे संजीवनी कोविड रुग्णालयाचे उद्घाटन,युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते झाले उद्घाटन,सातोनकर हॉस्पिटल व युवा मोर्चाने घेतला पुढाकार


परतुर (प्रतिनिधी )संजीवनी हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर प्रदीप सातोनकर व भाजयुमो च्या वतीने परतूर येथे संजीवनी डी सि एच सी कोविड रुग्णालयाचे उद्घाटन भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  भाजपाचे जेष्ठ नगरसेवक सुधाकरराव सातोनकर, डॉक्टर प्रदीप सातोनकर, डॉक्टर गायकवाड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी आर नवल, युवा मोर्चा सरचिटणीस संपत टकले ,भाजयुमो तालुकाध्यक्ष शत्रुघन कणसे नगरसेवक प्रकाशराव चव्हाण, नगरसेवक कृष्णा आरगडे ,नगरसेवक जगन बागल ,युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रवी सोळंके राजेंद्र मुंदडा माऊली सोळंके, श्याम सुंदर चितोडा, प्रशांत बोनगे ,किशोर कद्रे यांच्यासह संचालक  प्रवीण सातोनकर यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की राज्यभरामध्ये कोरोना ची भयावह स्थिती असून अशा स्थितीमध्ये शहरातील सर्वच रुग्णालयांच्या खाटा भरलेल्या आहेत
 यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागत आहेत मात्र ग्रामीण भागातील रुग्णांच्या समस्या लक्षात घेऊन सातोनकर हॉस्पिटल व युवा मोर्चाने पुढाकार घेत परतूर येथे कोविड सेंटर सुरू केल्याने बऱ्याच रुग्णांना फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बापू सातोनकर, डॉक्टर प्रदीप सातोनकर व प्रवीण सातोनकर यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना चे रुग्ण आढळत असल्याने हॉस्पिटल सुरू करण्याची गरज आपण व्यक्त केली होती  या पार्श्वभूमीवर  हे कोविड सेंटर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले असल्याचे सांगतानाच  राहुल लोणीकर म्हणाले की , विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत जी पाटील यांच्या सूचनेवरून परतूर येथील कोविड सेंटर जनतेच्या सेवेत रुजू होत असल्याचेही ते म्हणाले 
पुढे ते म्हणाले की ग्रामीण भागातील रुग्णांनी या रुग्णालयाचा उपयोग करून असेही ते म्हणाले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड