महाराष्ट्र सरकारने योग्य बाजू सुप्रीम कोर्टात न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाले-आमदार बबनराव लोणीकर


सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण आज रद्द करण्यात आले देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस व आम्ही सर्व सहकारी यांनी विधानसभा मध्ये आरक्षण संबंधित कायदा केला जो एकमताने मंजूर करण्यात आला.

मराठा आरक्षण साठी, मराठा समाजासाठी जे जे होईल ते प्रामाणिकपणे मराठा आरक्षण न्याय मिळवून देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सर्व सहकारी मंत्री मंडळाने  केले

परंतु आताच्या राज्यसरकारने मराठा आरक्षण बाबत योग्य न्यायिक भूमिका न घेतल्याने सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले, वारंवार वकील अनुपस्थित राहणे, तारखा विनाकारण वाढवून मागणे अश्या अनेक गोष्टी या सरकारने केल्या.

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची योग्य बाजू न मांडल्यानेच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आजचा दिवस संपूर्ण मराठा समाजासाठी दुर्दैवी आणि काळा दिवस आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड