परतूर येथे वीज कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती ती लावून काम बंद आंदोलन
फ्रन्टलाइन वर्कर घोषित करा या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणी करिता परतूर येथील महावितरण कर्मचारी अभियंता संघटना संयुक्त कृती समिती च्या वतीने उपविभाग कार्यालयाचे गेटवर काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करण्यात आले वीज कर्मचारी यांना राज्य शासनाने फ्रन्टलाइन वर्कर चा दर्जा देण्यात यावा कर्मचारी व त्यांच्या परिवाराचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, कोरोना महामारीत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे वारसांना 50 लाख रुपये अनुदान देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत या प्रसंगी वीज कर्मचारी अभियंता संघटनेचे पदाधिकारी एन व्ही बेंडाळे, रमेश आढाव, जी ए चंदेल, एम ए रामटेके, मोरखडे, सय्यद नौशाद, सोहेल, जाधव, नदीम , होंडे, एन बी सोमलकर , के पी कुलकर्णी ईत्यादि कर्मचारी उपस्थित होते.