CAAसदर्भात अधीसुचना जारी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून वाद असताना आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन अधिसूचना जारी केली आहे.
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) वाद असताना आता केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of home affairs) नवीन अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातून आलेल्या बिगर मुस्लिम शरणार्थींकडून भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिसूचनेत गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, हरयाणा आणि पंजाबमधील 13 जिल्ह्यात राहणाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. यात हिंदू, शीख, जैन, बौद्ध यांसारख्या बिगर मुस्लिम नागरिकांना नागरिकत्वासाठी अर्ज करता येईळ असं सांगण्यात आलं आहे.
अद्याप नव्या सीएए कायद्यांतर्गत नियम तयार नाहीत. सीएए कायद्याच्या माध्यमातून मोदी सरकारने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चनांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद केली होती. मात्र अजुन याचे नियम तयार झालेले नाहीत. त्यामुळे नागरिकत्वासाठी आधीपासून असलेल्या नियमांतर्गतच नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकत्व कायद्या 1955 आणि 2009 मध्ये तयार केलेल्या कायद्यांतर्गत नियमानुसार आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.