परतूर शहरात स्वच्छता मोहीम राबवावी - अर्जुन पाडेवार यांची मागणी
परतूर,दि.१(प्रतिनिधी) - शहरात साथरोग पसरू नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात यावे तसेच नालेसफाई, जंतुनाशक औषध फवारणी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
यासंदर्भात पाडेवार यांनी पालिकेच्या मुख्याधिका-र्यांना दिलेली निवेदनात म्हटले आहे की, शहरात घाणीचे प्रमाण वाढल्याचे दिसते.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरात साथीचे रोग झपाट्याने पसरू शकतात.सध्या शहराच्या अनेक भागात नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहताना दिसते.त्यामुळे दुर्गंधी देखील पसरते.रोगराई पसरू नये म्हणून शहरात जंतुनाशक औषधींची फवारणी करावी.तसेच शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी जेणे करून रोगराईचा प्रसार होणार नाही आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील असे या निवेदनात म्हटले आहे.
------------------------
शहर परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण सापडण्याअगोदरच नगरपालिकांनी याची काळजी घेतली तर साथरोग वेळीच आटोक्यात येईल त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करावी तसेच नगरपालिकेने शहरात स्वच्छता अभियान राबविण्यासह जंतुनाशक औषधीची फवारणी करणे आवश्यक आहे. - अर्जुन पाडेवार, सामाजिक कार्यकर्ते, परतूर.
-----------------------------