ग्राहकांनी डिजिटल सेवांच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार करावा-क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर यांचे आवाहन
आजच्या आधुनिक काळात ग्राहकांनी बँकिंग व्यवहार करतांना डिजिटल सेवांच्या माध्यमातून कॅशलेश व्यवहार करून बँकिंग सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन एसबीआय बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर यांनी केले. परतूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत ग्राहक मेळाव्यात ग्राहकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जालना विभागीय मुख्य प्रबंधक अभिनय भांबुर्डेकर, प्रबंधक अतुल सावजी, उपविभागीय पोलिस अधिकारी आर.डी. मोरे, मुख्य शाखा व्यवस्थापक सुधीरकुमार वाकोडे, एकनाथ कदम उपस्थित होते.
यावेळी संवाद साधतांना क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर म्हणाले की ग्राहकांने आजच्या डिजिटलच्या जमान्यात वावरत असतांना बँकेच्या डिजिटल सेवांची माहीती घेऊन कॅशलेश असा सुलभ व्यवहार करावा. यामधून वेळ आणि मेहनत वाचणार आहे. बँकच्या अधिकृत घोषित केलेल्या अपचा वापर करावा. बँक ग्राहकांच्या सुरक्षा आणि हितासाठी तत्पर आहे.
तसेच प्रबंधक अतुल सावजी बोलताना म्हणाले की बँकिंग डिजिटल सेवा मध्ये कार, गृह, यासह आदि कर्ज योजना या डिजिटल बँकिंग सेवामध्ये समाविष्ट केल्या आहेत. आणि बँकेत होणारी गर्दी ही डिजिटलकडे वळली आहे. ग्राहकांना कर्जसाठी आता सीबील स्कोअर तपासला जात असल्याने आपला बँकांचे घेतलेल्या कर्जाची नियमित कर्ज फेड करावी. आणि कर्जदारांचे साक्षीदार होतांना काळजी घ्यावी आणि व्यवहार करतांना पारदर्शक चोख ठेवावा. गुंतवणूक करतांना सर्वसामान्यासाठी बँकेने अनेक योजना आणल्या आहेत. तसेच अनेक नागरिकांना कुटुंबियांच्या आजारपणात लागणारा खर्च परवडणारा नसतो तसेच बचत नसल्याने पैशा ही नसतो अश्या वेळेस कोणाकडे हात पसरण्याची गरज पडते. यासाठी बँकेने आपल्या ग्राहकांचे हित जोपासत कमी खर्चात कुटुंबातील व्यक्तिला दवाखान्यात भरती होण्याची वेळ आली तर त्याला एक लाखापासून ते तीन लाख रुपये पर्यंत बँक त्यांचे रुग्णालयाचा खर्च भरणार आहे. यासाठी ग्राहकांनी मेडिकल विमा संरक्षण घेणे गरजेचे आहे. तसेच बँकेने मुलीसाठी सुकन्या योजना अमलात आणली आहे. मुलीच्या लग्नात लागणार्या खर्चाची तरतूद असणारी योजना अमलात आणली आहे. तसेच मुलीचा कर्ता पुरुष पालक अचानक मयत झाल्यास पुढील पैसे बँक भरणार आहे. याचा लाभ मुलीच्या विवाहाच्या प्रसंगी होणार असल्याने मुलीच्या कुटुंबियावर कर्जाचे ओझे होणार नाही. यासह अनेक बँकेच्या योजना या डिजिटल अपवर असल्याने ग्राहकांनी जास्तीत जास्त डिजिटल व्यवहारकडे वळण्याचे आवाहन केले आहे.
*याप्रसंगी ऊपविभागीय पोलिस अधिकारी आर.डी. मोरे बोलताना म्हणाले की बँक ही जनतेची आई वडीलासारखी विश्वासू पालक असते. बँकिंग क्षेत्रात आमुलाग्र बदल होत चाललेल आहे. खाजगीकरण आणि टेक्नॉलॉजीचा आजच्या काळात वापर वाढला आहे. यांचा फायदा करून घेतला पाहिजे. इतर देशात गेल्या वीस वर्षापूर्वी पासून टेक्नॉलॉजीचा वापर आहे. यासाठी काळानुसार बदल झाला तर माणसाची प्रगति आहे. तंत्रज्ञानावर मानव जातीची प्रगती असल्याचे प्रतिपादन मोरे यांनी शेवटी केले.* या मेळाव्याला शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, डॉक्टर, नोकरदार, बँक कर्मचारी, ग्राहक मोठ्या संखेने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रवींद्र डांगे यांनी मानले.
*फोटो ओळी.. परतूर येथे भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक मेळाव्यात बोलताना क्षेत्रीय प्रबंधक अभिजीत पांगरीकर, व्यासपीठावर जालना विभागीय मुख्य प्रबंधक अभिनय भांबुर्डेकर, प्रबंधक अतुल सावजी, उपविभागीय पोलिस अधिकारी आर.डी. मोरे, मुख्य शाखा व्यवस्थापक सुधीरकुमार वाकोडे, एकनाथ कदम.*