जयपुर तलाठी सज्जा सौ.माळी यांची तात्काळ बदली करा शेतकरी क्रांती सेनेची मागणी







मंठा (सुभाष वायाळ)तालुक्यातील मौजे जयपुर सज्जावर गेली सहा वर्षापासुन तलाठी सौ.माळी या रूजु आसुन कधीच सज्जावर हजर रहात नाही. यामुळे शेतीचे कामं व शेतकरी वर्गाला मोठी अडचण निर्माण होत आहे. जयपुर तलाठी सज्जा माळी यांनी सज्जावर काम करत आसतांना शासकीय कामात खुप मोठी अफरातफर केली आसल्याची लेखी तक्रार शेतकरी क्रांती सेना संस्थापक सिध्देश्वर काकडे यांनी परतुर उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्याकडे केली आहे. जयपुर तलाठी सज्जा सौ.माळी यांच्या गैर कारभाराची तात्काळ चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी शेतकरी क्रांती सेनेच्या वतीने परतुर उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. मंठा तालुक्यातील अनेक सज्जावर काही तलाठी हजर रहात नसुन यामुळे शेतकर्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आसुन जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आसल्याचा आरोप शेतकरी क्रांती सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी केला आहे. जयपुर तलाठी सज्जा माळी यांची बदली न झाल्यास आपण आंदोलन करणार आसल्याचे काकडे यांनी म्हटले आहे. जयपुर तलाठी सज्जा सौ.माळी या मंठा येथे बसुन काम पहातात. जयपुर तलाठी माळी यांचे सर्व कामकाज हे दलाला मार्फत चालत आसल्याचे शेतकरी क्रांती सेना अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी म्हटले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड