मुलांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे. – राजकुमार तांगडे


परतूर प्रतिनिधी(हनुमंत दवंडे)
 : मुलांना टक्केवारीच्या मागे धावायला लावून. आपण आपल्या उत्तपनाचा 60 % हिस्सा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत आहोत.  नोकर्या मिळवन्यासाठी मुलांना शिकवू नका तर त्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी शिक्षिति करा. शिक्षणा सोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येणोरा येथील कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेते,लेखक,नाटककार राजकुमार तांगडे यांनी केले. स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित स्थानिक कलावंत आणि सामाजिक विषयावर प्रबोधन करणार्या कलाकाराचा सन्मान सोहळा  कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. मुलांचे शिक्षण,आरोग्य, पोषण, बालविवाह,बाल मजुरी या विषयावर जिल्हातील गावा –गावात जाऊन कलापथक आणि पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करणार्या हरिभाऊ गायके, श्रद्धा वाघमारे, शरद शाळवे, गणेश घोडे, गणेश वाघमारे, किशोर घोडे, गोविंद जोगदंड आणि सचिन पाटोळे या कलाकारांचा राजकुमार तांगडे, संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंजाळ, मा. संरक्षण अधिकारी एकनाथ राऊत, गजानन तालुका अध्यक्ष  शाहीर घोडके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सरपंच विष्णू गायकवाड, उपसरपंच सुरेश भुंबर, गौतम पाटील(पो.पा.), सिमाताई जोगदंड अंगणवाडी सेविका,भागवत जोगदंड,भागवत भुंबर यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या संस्कृतिक विभागाचे प्रवृतक प्रमुख भास्कर साळवे, कार्यक्रम अधिकारी माधव हिवाळे, कला विभागाचे प्रमुख सोमेश सोनटक्के, आणि विठ्ठल सुभेदार हे उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी