मंठा महा.वीज वितरण कंपनीचा कारभार बेभरोसा- शेतकऱ्यांची विज अभावी पिके करपू लागली
मंठा (सुभाष वायाळ)दि.27 मंठा तालुक्यातील महा.विज वितरण कंपनीचा कारभार हा परतुर या ठिकाणावरून सध्या चालत आहे. मंठा येथील अधिकृत अधिकारी म्हणून पदावर असणारे मुख्यअभियंता श्री खंडागळे यांची बदली होऊनबरेच दिवस ओलांडले आहेत. तरी आतापर्यंत कुठलेही अधिकारी त्या पदावर रुजू झाले नाही. मंठा तालुक्यातील चार्ज हा परतुर येथील अभियंता श्री बेंडाळे यांच्याकडे आहे. ते मंठा येथे चार्ज घेतल्यानंतर फिरकलेच नाही.मंठा महा. विज वितरण कंपनी मध्ये शेतकरी व नागरिक त्यांच्या कामा करिता गेले तर तेथील अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. व सध्या चार्ज परतुर येथील अधिकाऱ्याकडे आहे. आम्ही काही करू शकत नाहीत. त्यांना येऊ द्या नंतर तुम्ही तुमचे काम सांगा असे सांगून वेळ मारून नेत आहेत. सध्या तालुक्यामधील बऱ्याचशा शेतकरी नागरिकांची नवीन वीज जोडणी, मीटर खराबी,विज बिल वाढ, विज बिल दुरुस्ती, नवीन ट्रांसफार्मर (डीपी)घेणे, ट्रांसफार्मर(डीपी.)दुरुस्ती, शेतकऱ्यांना वीज पुरवठा ही रात्री केला जात आहे.त्यामध्ये ही बऱ्याच वेळा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.अशी अनेक कामे रखडलेली आहेत. तरी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चौकट
मंठा येथे प्रभारी असलेले परतुर येथील अभियंता श्री बेंडाळे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. सामान्य शेतकऱ्यांना तर त्यांचा भ्रमणध्वनी नंबर ही मंठा कार्यालयात कोणी देत नाही.