माता-पित्याची सेवा हीच खरी ईश्वर ,बदलत चाललेली समाजव्यवस्था घातक,हभप बंडातात्या कराडकर महाराज,आई वडिलांच्या शिकवणी मुळेच मी इथपर्यंत पोहचलो*-*माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


प्रतिनधी(आष्टी)
आई-वडिलांच्या सेवेत सर्व सुख सामावलेले असून,आई वडिलांच्या आज्ञेत राहणारा प्रत्येक मुलगा ईश्वराच्या जवळ आहे असे प्रतिपादन हभप बंडातात्या कराडकर यांनी केले
   ते लोणी खु ता परतूर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे वडील स्व. दत्तात्रय (नाना) लोणीकर यांच्या चौदाव्याचा कार्यक्रमा प्रसंगी हरिकर्तनात बोलत होते
     
*आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिया।*
*कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक। तयाचा हरिख वाटे देवा।*
*गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे।*
*तुका म्हणे मज घडो त्याची सेवा। तरी माझ्या दैवा पार नाही॥*
  या अभांगचे निरूपण करताना त्यांनी अनेक दाखले देत मातृ पित्र सेवेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून युवा पिढीने हे व्रत अंगिकारने गरजे असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले
    पुढे हभप बंडातात्या कराडकर म्हणाले की, बदलत चाललेली समाजव्यवस्था ही, विघातक असून या व्यवस्थे मुळे आई वडील पती पत्नी  या नात्याना तिलांजली दिली असून या मुळे सांस्कृति विनाशाच्या उंबरठ्यावर आपण असून हे थांबवन्यासाठी सांस्कृति चे जतन करणे गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले 
=======================
*आई वडिलांच्या शिकवणी मुळेच मी इथपर्यंत पोहचलो*
*माजी मंत्री बबनराव लोणीकर*
=======================
उपस्थितांचे आभार मानताना माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, आई वडिलांनी केलेल्या संस्कारा मुळे आपण राजकारणाच्या माध्यमातून समाजाची सेवा करू शकलो असे सांगतानाच माझे वडील धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांनी संपूर्ण आयुष्य पंढरपूर ची वारी न चुकता केली अनेक प्रसिद्ध कीर्तनकाराच्या किर्तना मध्ये आपल्या अभंगाच्या माध्यमातूंन सेवा केली  असे भावूक उदगार या वेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले..!!

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार