दैठणा खु. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय सवने यांची निवड



परतूर (हनूमंत दंवडे) तालुक्यातील दैठणा खुर्द येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विजय सवने तर उपाध्यक्षपदी बालाजी नखाते यांची निवड यांची करण्यात आली आहे. पालक सभेतून निवडलेल्या सदस्यांमधून सर्वानुमते ही निवड करण्यात आली आहे. मंगळवारी शालेय व्यवस्थापन समितीची बैठक सरपंच राधा सोनाजी गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. निवडी नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम भापकर यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार केला आहे.
        पालक सभेतून सदस्य निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सरपंच राधा गाडेकर,केंद्र प्रमुख देशमुख, केंद्रीय मुख्याध्यापक खंडागळे, मुख्याध्यापक श्रीराम भापकर, शिक्षक अज्जू कायमखानी, अशोक माने, प्रकाश जोगदंड, चौधरी, कराड आदींसह गावकऱ्यांची  उपस्थिती होती.  नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती मध्ये अध्यक्ष विजय सवने, उपाध्यक्ष बालाजी नखाते, सदस्य शीतल सवने, इरफाना शेख, ब्रम्हानंद तायडे, अतिष गाडेकर, बिबनभाई शेख, रेणुका लिंगायत, सरिता सवने, सुनिता पाईकराव, सुरेश काटकर, सागर सवने यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे  बंडेराव सवने, शिवाजी सवने  सुरेशराव सवने, सरपंच राधा सोनाजी गाडेकर, राजेश काटकर, महादेव सवने, दौलत सवने, रामा कचरे, दत्ता गाडेकर, पांडुरंग काटकर, बाळासाहेब ताठे लक्ष्मीकांत सवने, सुनील तायडे, शेख युनूस, शेख खमर, भगवान सोळंके, अशोक लिंगायत यांनी नूतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत