येणारा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली..
परतूर प्रतीनिधी/हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील येनोरा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांची 424 वी जयंती साजरी करण्यात आली.
ज्या शूर माता- पुरूषांनी आपल्या देशाचे नाव इतिहासात अजरामर केले अथवा ज्यांनी आपल्या कर्तबगारीने अनेक यशस्वी रण गाजवले ,त्यांच्या कृृत्याचे कितीही स्मरण केले तरी त्यांच्या ऋणातून सर्वस्वी मुक्त होणे कठिण आहे. राष्ट्रमाता ,राजमाता जिजामाता यांचा जन्मोत्सव साजरा करण्यामागे हीच कृतज्ञतेची भावना आहे. राष्ट्रातील या महान राजमाता लोकमाता आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व कायम राखण्यास चांगले साधन आहे.
असे यावेळी बोलताना भागवत भूंबर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी रमेश भाऊ भुंबर,नाथाभाऊ शिंदे,भागवतदादा भुंबर,भास्करराव साळवे, दिगंबर गायकवाड, अर्जुन मोरे, अशोक दवंडे, पांडुरंग भुबर, वैष्णव भुबर कृष्णा तौर यावेळी उपस्थित होते...