परतूर शहरातील वाहतूक कोंडी बाबत सम-विषम पार्किंग व्यवस्थावाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे पोलीस निरीक्षक कौठाळे याचे आवाहन



परतूर/शेख अथर 
 शहरात नेहमीच होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परतूर पोलिसांनी शहरात पी.वन पी टू पार्किंग व्यवस्था येत्या दोन दिवसात सुरू करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली.
शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.
शहरातील मुख्य रस्त्यांवर यासाठी फलकही लावण्यात येणार असून याबाबत व्यापारी वर्गात व जनसामान्य नागरिकांना माहिती व्हावी म्हणून जनजागृती ही करण्यात येणार असून.
यामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात का होईना सुटणार आहे . शहरात ग्रामीण भागातील शेतकरी खरेदी - विक्रीसाठी येतात तसेच शासकीय व खाजगी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्याही अधिक आहे .त्यामुळे शहरात वाहनांची नेहमी वर्दळ असते . शहरातील मुख्य रस्त्यावर सर्व शासकीय कार्यालये व बाजारपेठेतील महत्वाचे दुकाने असल्याने मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जातात.या बेशिस्त वाहनांमुळे मुख्य रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडी वाढत जाते . ही समस्या लक्षात घेऊन  पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी  पुढाकार घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावर पार्किंगसाठीच्या खुणा करून व रस्त्याच्या दोन्ही बाजूस पी वन , पी टू चे फलक लावून स्थानिक व्यावसायिक व नागरिकांना सम - विषम तारखेनुसार वाहने उभे करण्याच्या सूचना दिल्या देण्यात येणार आहे . पी वन , पी टू पार्किंग व्यवस्थेचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात येणार असून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने नागरिकांनी सम - विषम तारखेला पी वन , पी टू पध्दतीने आपली वाहने उभी करावी , असे आवाहन करण्यात आले आहे . येणाऱ्या काळात शहरात पार्किंगसाठी स्वतंत्र जागा पाहून नियोजन करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे  यांनी सांगितले
तसेच नागरिकांनी समविषम पार्किंग बाबत सहकार्य करावे जेणेकरून शहरातील वाहतूक कोंडीची समस्यां सोडवण्यात मदत होईल असे आवाहन पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले 
यावेळी सचिन पुंडगे,गोरखनाथ शेळके,नितीन गट्टूवार यांच्यासह सादेख खतीब,द.या.काटे,अर्जुन पाडेवार,एम एल कुरेशी,योगेश बरीदे,श्यामसुंदर चित्तोडा, राहुल मुजमुले, सागर काजळे, संतोष शर्मा, दीपक हिवाळे, सय्यद वाजेद, सर्फराज नायकवाडी,असेफ शेख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लादून दिलेल्या निर्बंधाचे पालन करण्यात आले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....