रायगव्हाण येथे राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश,माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून केला प्रवेश,भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष,प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर


प्रतिनिधी(सुभाष वायाळ)
रायगव्हाण तालुका परतुर येथील अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला
      यावेळी बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे तिथे तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी दिली जाते या पक्षामध्ये कुणाची एकाधिकारशाही नसून संघटनेच्या बळावरच आज रायगव्हाण येथील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याचा निश्‍चितपणे फायदा पक्षासाठी होईल असा आशावाद यावेळी त्यांनी व्यक्त केला
पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज अनेक समाज उपयोगी कामे झाली असून राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मतदार संघाचा चौफेर विकास झाला असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले वीज सिंचन रस्ते विकास यासह तात्कालीन सरकारच्या काळामध्ये मतदार संघामध्ये फिल्टर पाण्याची वॉटर ग्रीड व शेगाव पंढरपुर दिंडी मार्ग का सारखा महत्त्वपूर्ण प्रकल्प गेला असून यासह असंख्य कामे प्रत्येक भागामध्ये झाली असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले
खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नसून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राज्याला व मतदार संघाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाता येईल म्हणूनच भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून या पक्षाच्या माध्यमातून जनतेची सेवा करा असे यावेळी प्रवेशित कार्यकर्त्यांना राहुल लोणीकर यांनी सांगितले
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेवराव कडपे, भागवत पोटे, केशव कडपे, ज्ञानदेव कडपे, बाबुराव कडपे यांनी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
याप्रसंगी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी प्रवेशित कार्यकर्त्यांचा भाजपा चा शेला व पुष्पहार देऊन सत्कार केला
 याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर सोळंके परमेश्वर केकान शिवदास पोटे नवनाथ नवल राजाभाऊ पोटे प्रदीप पोटे शिवहरी पोटे सिद्धेश्वर केकान दत्तात्रेय केकान बाळासाहेब पोटे रमेश पोटे महादेव वाघमारे वाल्मिक मैद, सुनील पोटे संजय सोनवणे रंगनाथ राऊत महादेव पोटे बबन पोटे अर्जुन पोटे विष्णू पोटे अंकुश पोटे नामदेव कडपे केशव कडपे ज्ञानोबा कडपे सतीश पोटे बाबू कडपे हनुमंत पोटे रामदास सोनटक्के तुकाराम केकान यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले