रांजनी येथे सभु मा. वीद्यालयात कोविड लसीकरणास प्रारंभ


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे                   
श्री सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,रांजनी दिनांक : ६ जानेवारी रोजी
 प्रशालेत शासन आदेश व परिपत्रकाप्रमाणे कोविड 19 लसीकरणास सुरुवात करण्यात आली.वयवर्ष १५ ते १८ या वयोगटातील मुलामुलींना ही लस देण्यात येणार आहे.
लसीकरण सुरु होण्यापूर्वी दाखल झालेल्या सर्व आरोग्य कर्मचारी,आणि वैद्यकीय अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष मा.श्री नानासाहेब देशमुख,प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री विश्वरूप निकुंभ सर,पर्यवेक्षक श्री अतुल हेलसकर, कपिल दहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मा.मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार आणि आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार हे लसीकरण वर्ग व शिक्षकांच्या विविध टीम तयार करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने घेतले जाणार आहे.यासाठी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रांजणी डॉ.स्वप्नील राठोड,आरोग्य सेविका श्रीमतीशारदा धंदाले,मीरा गाढवे,महानंदा मुळे, आरोग्य सेवक श्री कैलास गर्जे,रितेश तौर,संजय घुगरे श्रीमती विशाखा जोंधळे काम पाहत आहेत.तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या टीम तयार करण्यात आल्या असून वर्ग तुकडीनुसार लस देण्यात येत आहे.
लसीकरण यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी काम पहात आहेत.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड