सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणी येथे अंखड हरिनाम सप्ताहास शनीवारीपासून प्रारंभ



तळणी (रवी पाटील) मंठा तालूक्यातील तळणी येथे उद्यापासून शनिवार पासून अंखंड हरिनाम सप्ताहास प्रारभं होत असून या सप्ताह मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण जगदगूरू तुकाराम महाराज संगीत चरिञ भाव कथा काकडा भजन हरिपाठ व हरीकीर्तनाचे आयोजन संमस्थ तळणी ग्रामस्थ श्री संत सेवा तरूण मंडळाच्या वतीने आयोजीत केले आहे या सात दीवसीय सप्ताह मध्ये तुकोबाराय यांचे चरीञ वक्ते म्हणून ह भ प तुंकाराम महाराज परळीकर हे असणार आहेत तर या सप्ताहचे व्यासपीठ चालक म्हणून ह भ प दत्तात्रय महाराज पवार ह भ प कैलास महाराज टीटवीकर व ह भ प चरणसिह महाराज हे असणार आहेत तर या सात दीवसात महाराष्ट्रातील नामंवत कीर्तनकाराची हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये ह भ प सुदाम महाराज पानेगावकर ह भ प सोपान महाराज सानप ह भ प निलेश महाराज कोरडे ह भ प जंयवंत महाराज बोधले ह भ प झानेश्वर महाराज पाटील ह भ प अशोक महाराज ईदगे ह भ प संजय महाराज पाचपोर तर काल्याचे कीर्तन भागवताचार्य शिवांनंद महाराज शास्त्री यांचे होणार असुन या सप्ताह निमित्य भव्य समुदायक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन या साठी नोदणी करण्याचे आव्हाहन श्री संत सेवा तरुण मंडळाकडून करण्यात आले तसे रक्तदान शिबिरामध्ये सुद्धा ग्रामस्थानी सहभाग नोदवांवा असे आवाहन सप्ताह समीतीकडून करण्यात आले

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत