औरंगाबाद येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास खा. इम्तियाज जलील यांचा विरोध परतूर येथे तरुणांनी केला निषेध...



प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
महाराणा प्रताप, देशाच्या शौर्याचं, राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रवादाचं प्रतिक आहे"
           औरंगाबाद शहरात आणखी एका पुतळ्यावरून सध्या वाद  निर्माण झाला आहे. शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. तब्बल एक कोटी खर्च करुन हा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. एकीकडे शिवसेना, भाजपाने या पुतळ्यासाठी आग्रही मागणी केली असताना दुसरीकडे एमआयएमने मात्र विरोध दर्शवला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळ्याला विरोध केला आहे. याच्या निषेधार्थ परतूर येथे अनेक तरुणांनी एकत्र येऊन खा. इम्तियाज जलील यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला या मध्ये राजपूत, सावता काळी, गोपी ठाकूर, कृष्णा आरगडे, शिवा भाऊ बलमखाणे , अमोल जोशी, मुकुंद ठाकूर, मुकेश राजपूत, पवन पवार, प्रवीण द डूकरे ,बाळू चींचाने,  , नंदू राजपूत, दिनेश राजपूत , नितीन राजपूत, भैया राजपूत, संदीप राजपूत, सर्व रास्ट्रप्रेमी , समाज प्रेमी या वेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड