आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं लॉक डाऊन बाबत मोठं विधान.


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
राज्यात कोरणा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे दोन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत ही वस्तुस्थिती आहे पण राज्यात लॉक डाऊन बाबत सध्या कोणताही विचार नाही केवळ निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत सरकार काम करत आहे .
अशी माहिती राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. काय म्हणाले आरोग्यमंत्री राज्यात दोन दिवसात करोणाचे रुग्ण दुप्पट होत असल्याचं दिसून येत आहे. आजचाही राज्याचा करोणा रुग्णसंख्या चा आकडा 12 ते 15 हजारांच्या घरात जाऊ शकतो. असा अंदाज आहे व मायक्रोनच्या संसर्गाचे प्रमाण अधिक असू नये ही काळजीची गोष्ट आहे. कारण यात मृत्यू दर अधिक आहे त्यामुळे  आणि व मायक्रोन चे रुग्ण यांच्यातील प्रमाण  कमी करणं आवश्यक आहे .याबाबतची सूचना प्रशासनाला देण्यात आले आहेत राज्यात करोणा रुग्ण संख्या वाढत असली तरी लॉक डाऊन चा कोणताही विचार सरकारने केलेला नाही मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्य विभागाची तब्बल दोन तास बैठक झाली या बैठकीत लॉक डाऊन चा निर्णय झाला नाही. पण निर्बंध आणखीन कठोर करण्याबाबत निर्णय  घेतले जाऊ शकतात आता सध्या लागू असलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन केले जाईल. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
राज्यात  बेडस आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार निर्बंध बाबतचे पुढील निर्णय घेतले जातील. ज्या दिवशी राज्यात सातशे मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज भासेल तेव्हा राज्य ऑटोमॅटिक लोक डाऊन मध्ये जाईल. पण सध्या तसा अजिबात विषय झालेला नाही लॉक डाऊन म्हटलं म की त्याचा थेट अर्थकारणावर परिणाम होतो हातावर पोट असलेल्या ना याचा मोठा फटका बसतो त्यामुळे लोक डाऊन चा कोणताही विषय सध्या झालेला नाही असं राजेश टोपे म्हणाले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत