पांडुरंगाच्या आशीर्वादानेच मतदारसंघाच्या विकासासाठी ताकद मिळाली - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर,०१ कोटी ०७ लक्ष रुपयांच्या विकास कामाचे लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण


मंठा (सुभाष वायाळ )
पंढरपूरचा पांडुरंग हे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असून पांडुरंगाच्या आशीर्वादाने परतूर विधानसभा मतदार संघाच्या विकास कामासाठी मला ताकद मिळाली असून विदर्भ पंढरी असणाऱ्या शेगावचे गजानन महाराज आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने मी मंत्री झालो विकास कामे करण्याची ताकत पांडुरंगाच्या आशीर्वादानेच मिळाली अशा शब्दांत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

मंठा तालुक्यातील तळणी व हेलस या गावातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण प्रसंगी बोलत होते यावेळी हभप शिवानंद महाराज पैठणकर भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ पंचायत समिती उपसभापती नागेशराव घारे जि.प. सदस्य पंजाबराव बोराडे गजानन देशमुख विठ्ठलराव काळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री अशोकराव वायाळ हभप रावसाहेब महाराज खराबे कैलास खराबे पांडुरंग खराबे केशव खरावे दीपक खराबे नितीन सरकटे गणेशराव कापूर भगवान महाराज सरकटे अशोक राठोड रवी पाटील शरद सरकटे सिद्धेश्वर सरकटे शरद सरकटे केशव येऊल काय केलं सोपानराव वायाळ प्रमोद बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती
===========================
*०१ कोटी ०७ लक्ष रुपयाच्या विकास कामाचे लोणीकर यांच्या हस्ते लोकार्पण*
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले तळणी येथील ५५ लक्ष रुपये किमतीचे ०२ सभामंडपाचे भूमिपूजन, हेलस येथील २५ लक्ष रुपये किमतीचे सभागृह, १७ लक्ष रु किमतीचे वॉटर फिल्टर,१० लक्ष रु किमतीच्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण आज लोणीकर यांच्या हस्ते सम्पन्न झाले.
==========================
मतदारसंघात कोट्यावधीची विकास कामे करत असताना जनतेच्या आशिर्वाद सोबतच वारकऱ्यांची शाबासकीची थाप आणि आशीर्वाद पाठीशी होते म्हणूनच शेगाव ते पंढरपूर सिमेंट कॉंक्रिट असणारा राष्ट्रीय महामार्ग केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या माध्यमातून आपण मिळवू शकलो मतदारसंघातील सर्व गावांना डांबरीकरणाचे रस्ते संपूर्ण मतदारसंघासाठी फिल्टर पाण्याची वॉटर ग्रिड १०० पेक्षा अधिक गावांना सभामंडप प्रत्येक गावातील गावांतर्गत सिमेंट रस्ते यासह तीर्थक्षेत्र विकास अशा एक ना अनेक विकास कामे करण्याची ताकद मिळाली असेही यावेळी बोलताना लोणीकर यांनी स्पष्ट केले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार