नाना पटोले यांचे वागणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि, पटोले यांना तात्काळ अटक करा,त्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी,प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी पटोले यांची धडपड, अटक न केल्यास भाजपाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन - लोणीकर
प्रतिनिधी-हनूमंत दंवडे
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो अशा शब्दात गरज ओळखली असून नाना पटोले यांचे वागणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि अशा स्वरूपाचे आहेत त्यांना तात्काळ अटक करून महाराष्ट्र सरकारने लोकशाही जिवंत आहे असे महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले
सत्तेचा माज आणि मस्ती चढल्यानंतर आपण काय बोलतो याचे भान राहात नाही आणि तीच अवस्था काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची झाली असून नाना पटोले यांच्या बुद्धिचा भोपळा झालेला आहे संपूर्ण राज्यभरात नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून नाना पटोले यांना तात्काळ अटक न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने याहीपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असेही लोणीकर यावेळी म्हणाले
देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची मान जगभरात उंचावली असून देशाला आर्थिक महासत्ता जागतिक महासत्ता बनवण्यासाठी मोदीची प्रयत्नशील आहेत असे असताना केवळ गांधी घराण्याला खूष करण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वारंवार नाना पटोले यांच्या कडून मोदींच्या विरोधात गरळ ओकली जात आहेत परंतु आता त्यांच्या पापाचा घडा भरला असून मोदीजीं वरील यापुढे सहन केली जाणार नाही असेही लोणीकर यावेळी म्हणाले
लहान लहान वक्तव्यावरून महाराष्ट्रात महाल कास आघाडी सरकारने अनेकांना अटक केली आहे तर मग नाना पटोले यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल जी गरळ ओकली त्याबद्दल अटक का नाही? केवळ सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय आहे काय? त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकार गुन्हा दाखल करणार का? की लोकशाहीचा गळा घोटून नाना पटोले यांना महाराष्ट्र सरकार अभय देणार? असा सवाल देखील लोणीकर यांनी उपस्थित केला आहे