मैदानी खेळ म्हणजे उत्कृष्ट खेळाडूनां आपले कौशल्य दाखवण्याचं उत्तम व्यासपीठ-मोहन अग्रवाल
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात अंतिम सामन्यात नितीन ११ चा पराभव करत बुद्धभूषण या संघाने विजेतेपद मिळवले
दि.9 रविवार रोजी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना शहर च्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेचा अंतिम सामना रविवार रोजी रंगला होता या अटीतटीच्या सामन्यात बूद्धभुषण संघाने जेतेपद पटकावले
याप्रसंगि शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी बोलताना मोहन अग्रवाल यांनी सांगितले की शहरासह ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमींनी अश्या स्पर्धेच्या माध्यमातून आपले कर्तृत्व व कौशल्य सिद्ध करून शहराचे नाव राज्य पातळीवर न्यावे तसेच अश्या स्पर्धेमधून गुणी खेळाडू तयार व्हावे अशी भावना व्यक्त केली प्रथम पारितोषिक शिवसेनेचे युवा नेते महेश नळगे यांच्याकडून ठेवण्यात आले होते तर दुसरे पारितोषिक नगरसेवक शरीफ कुरेशी यांच्या वतीने होते
यावेळी महेश नळगे,शरीफ कुरेशी,अशोकराव आघाव,मधुकर पाईकराव,दत्ता सुरुंग,कदिर कुरेशी,आबा कदम, विदुर जईद,अहमद चाऊस,शुभम दिंडे,व शिवमुद्रा प्रतिष्ठाण चे सर्व सहकारी,यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते
सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना अल्पसंख्याक शहराध्यक्ष अहमद चाऊस मित्र मंडळ यांच्यासह सरफराज कायमखानी,शेख अतिख,सालमीन चाऊस,शेख अहमद,विदुर जईद,यांनी परिश्रम घेतले.