अंगावर शहारे आणणारा ‘पावनखिंड’ चा ट्रेलर रिलीज…


प्रतिनिधी परतूर/हनुमंत दवंडे
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडल्या जात आहेत. यात आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाचा ट्रेलर  नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

दिग्दर्शक लांजेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेल ! हर हर महादेव’
या चित्रपटात पावखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहाताना अक्षरशः अंगावर काटा येतो. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता असल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट येत्या १८ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात