मंठा येथील चोरीला गेलेली स्कार्पियो गाडीचा पोलीसा कडून शोध मंठा पोलिस प्रशासनाची यशस्वी कार्यवाही
मंठा (सुभाष वायाळ )दि. १३ मंठा येथील महादेव गॅरेज समोर उभी असलेली स्कार्पियो गाडी दिं २४/०१/२०२२ रोजी चोरीस गेल्याची घटना घडली.
महादेव बाबाराव जावळे यांच्या महादेव गॅरेज समोर उभी असलेली स्कार्पियो गाडी ज्याचा आर टी ओ क्रमांक MH -15 -BD-7186 ही दिं २३/०१२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता महादेव गॅरेज समोर उभी होती व सकाळी दिं २४/०१/२०२२ रोजी महादेव जावळे यांनी आपली उभी असलेली स्कार्पियो गाडी समोर न दिसल्याने तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सदरील गाडीचा शोध कुठेही लागत नसल्याने त्यांनी मंठा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली व घडलेल्या घटनाची सविस्तर माहिती मंठा पोलिस स्टेशनला सांगीतली.महादेव बाबाराव जावळे यांच्या फिर्यादिवरून मंठा पोलिस प्रशासनाने सदरील गाडीचा लावण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या प्रयत्नाला आखेर यश आले ११ दिवसातच गाडीचा शोध लागला व गुन्हेगार पकडण्यात यश आले. सदरील स्कार्पियो गाडी हि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलिस ठाणे येथुन सदरील वाहन व आरोपीचा शोध लागला असुन यामध्ये चार आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत.ज्यांची नावें १) संतोष हनुमान धनगर वय २६ वर्ष २) ज्ञानेश्वर श्रावण माळी वय २७ वर्ष ३) राम भगवान गव्हाणे वय २४ वर्ष हे तिन्हि राहणार गोपाळ वस्ती बेळगांव ता.गेवराई जि बीड व ४) विशाल बाबासाहेब जाधव वय २४ वर्ष रा.म्हासाळा पिंपळगांव ता. नेवासा.जि.आहेमदनगर यांना ताब्यात घेतले असुन पुढिल कार्यवाही पो हे काॅं डी सी ढवळे हे करीत आहे.
सदरील कार्यवाही ही मा पोलिस अधिक्षक श्री विनायक देशमुख, मा अप्पर पोलिस अधिक्षक श्री विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राजु मोरे, पोलिस निरिक्षक श्री संजयजी देशमुख ,पो उप निरीक्षक आसमान शिंदे,व पो उप निरीक्षक बालभिम राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे काॅं दिपक ढवळे, पो हे काॅं शंकर राजाळे, पो काॅं वसंत राठोड़,पो काॅं मनोज काळे,पो काॅं कानबाराव हराळ,पो काॅं दिपक आढे, पो काॅं प्रशांत काळे, पो काॅं आनंता ढवळे, पो काॅं महादेव वाघ,पो काॅं सदाशिव खैरे,व सविता फुलमाळी यांनी ११ दिवसातच सदरील गाडीचा शोध लावला.