परतुर न्यायालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
दिनांक 28/ 2/ 2022 रोजी तालुका विधी सेवा समिती परतुर वकील संघ परतुर यांच्या संयुक्त विद्यमाने वकील संघ हॉल परतूर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सदरील शिबिरांमध्ये माहितीचा अधिकार कायदा 2005 , महाराष्ट्र राज्य नागरी सेवाअधिकार 2015 ,अपघात प्राधिकरण हे विषय ठेवण्यात आले होते
         .सदरील कार्यक्रमास ए. जी.चव्हाण अध्यक्ष तालुका वकील संघ ,यांनी माहितीचा अधिकार कायदा 2005 या विषयावर सखोल माहिती सांगितली .तसेच विधिज्ञ श्री .एस. जी. देशपांडे यांनी महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिकार 2015 या विषयावर मार्गदर्शन केले तसेच विधिज्ञ श्री. दराडे यांनी अपघात प्राधिकरण या विषयावर माहिती सांगितली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. श्रीमती .पी. एम .कोकाटे दिवाणी न्यायाधीश क स्तर परतुर, तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतुर ,यांनी मराठी भाषा गौरव दिन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले व अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या की दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा वि .वा. शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच मराठी साहित्यक्षेत्रात अनेक कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह ,वि .वा .शिरवाडकर यांनी लिहून मराठी साहित्यात मोठे योगदान दिलेले आहे असे सांगून अध्यक्षीय भाषण संपन्न केले विधिज्ञ श्री ए. जवळेकर वकील संघ परतूर यांनी सूत्रसंचालन केले .विधिज्ञ श्री. डी. एम . डहाळे, वकील संघ परतुर यांनी आभार प्रदर्शन केले तसेच विधिज्ञ वकील संघ परतुर व जेष्ठ विधिज्ञ व न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी