मंठा तालुक्यातील बहुतांशी अधिकारी-कर्मचारी यांना मुख्यालय राहण्याची ॲलर्जी



 मंठा-/प्रतिनिधी पप्पू घनवट
      दि.9 मंठा शहरासह  भागात कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी हे मुख्यालय राहताना दिसून येत नाहीत. यामुळे स्थानिक नागरिकांना  अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शासन निर्णयाप्रमाणे सर्वांना मुख्यालयी राहणे अनिवार्य आहे. तरीपण ही मुजोर अधिकारी-कर्मचारी  या नियमाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. यामधील काही कर्मचारी आहे हे जालना,परभणी, नांदेड,औरंगाबाद,परतुर, लोणार,जिंतूर, सेलू, या ठिकाणाहून ये-जा करत असतात. त्यांच्या या येणे-जाणे करण्याच्या कारणामुळे हे कार्यालयीन वेळेवर हजर होत नाही. बाहेरगावी जाण्याचे असल्या कारणामुळे तर कार्यालयीन वेळेच्या अगोदर निघून जातात. यांच्या या असल्या वेळेमुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच बऱ्याच कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी हे हॉटेलमध्ये शोधावे लागतात. काही अधिकाऱ्यांनी तर कमालच केली आहे.चक्क स्वतःचे काम करण्यासाठी रोजंदारीवर ठराविक रक्कम देऊन माणसे ठेवलेली आहेत.तसेच खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांना अधिकरी कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तरी संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्या मुजोर अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकातून होत आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी