परतुरात 1990 च्या वर्ग मित्रांच्या गुणवंत मुलांचा सत्कार संपन्न प्रत्यक्ष व झूम मिटिंग द्वारे मित्रांनी केले पाल्यांचे कौतुक

परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 जि. प.प्रशाला शाळेच्या सन 1990 च्या वर्गमित्रांचे स्नेहमिलन कार्यक्रम 25 डिसेंबर 2019 ला संपन्न झाला होता. या सर्व मित्रांचा व्हाट्सअप्प च्या माध्यमातून संपर्क कायम राहिला. या मित्रांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ हॉटेल आस्वाद येथे पार पडला.
परतूर येथील मित्र प्रत्यक्षपणे तर बाहेरगावातील मित्र झूम ऍप प्रणाली द्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील व्यावसायिक राहुल कुंपावत होते. या प्रसंगी सार्थक काशीनाथ देशमुख याचा कॉम्प्युटर सायन्स ला आणि सुशांत संदीप बाहेकर व नरेंद्र प्रशांत अंभुरे याचा MBBS ला प्रवेश झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जीवनातील सुख ,आनंद वाढविण्यासाठी व दुःख कमी करण्यासाठी मित्रासारखे नाते नाही. त्यामुळे सदरील नात्याला बळकटी देण्यासाठी मित्रांच्या गुणवंत मुलांचे कौतुक केलेच पाहीजे. याप्रसंगी नगरसेवक संदीप बाहेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत अंभुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे समारोप राहुल कुंपावत यांनी केला. याप्रसंगी संतोष चव्हाण, केदार शर्मा, सुनील मोर, परवेझ देशमुख, पुरुषोत्तम राठी,अनिल कुलकर्णी, प्रकाश खालापूरे,रमेश ठोंबरे, शामसुंदर चित्तोडा, राम देशपांडे, काशिनाथ देशमुख, उपस्थित होते तर डॉ.सतीश मुंदडा, राहुल कुलकर्णी, आनंद आसोलकर व इतर झूम प्रणाली द्वारे सहभागी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामा माने यांनी केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी