न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंठा येथे मनसे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 51जणांनी केले रक्तदान

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मनसे अध्यक्ष  राजसाहेब ठाकरे यांनी तिथीनुसार येणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करा‌ असे आवाहन केले होते
 तिथीनुसार शिवजयंती चे औचित्य साधून मनसे नेते  दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस  संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष  अशोक  तावरे‌ यांच्या मार्गदर्शनाखाली 
मनसे मंठा तालुकाध्यक्ष अध्यक्ष  गणेश  बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंठा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले, या शिबीराला मंठा तालुक्यातील नागरिकांनी व‌ महिला भगिनींनी असे एकूण 51 जनांनी रक्तदान केले. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत