हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर (आशिष धुमाळ)
तालुक्यातील हातडी शिवारात 11 मार्च शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास गावातील सचिन शिंदे सह काही शेतकर्‍यांना शेतात काम करत असतांना बिबट्या निदर्शनास पडला.या घटनेला सरपंच मधुकर झरेकर यांनी दुजोरा दिला आहे. बिबट्याची व्हिडिओ क्लिप परतूर परिसरात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
         परिसरातील शेतात बिबट्याच्या पायाचे ठस्से सुध्दा दिसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.गावकर्‍यांनी व सरपंच मधुकर झरेकर यांनी बिबट्या आढळ्याची माहिती वनविभागाला देताच वनविभागाचे व्हि.पी. अवचार घनसावंगीचे वनरक्षक पवार व वनमजुर यांनी हातडी शिवारात हजर होत पायाच्या ठस्यावरून बिबट्याचा शोध सुरू केला आहे. शेतकर्‍यांनी एकटे शेतात जाऊ नये तसेच पाळीव प्राण्याची काळजी घेण्याचे आवाहन सरपंच मधुकर झरेकर व वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत