तीन दिवसीय गीता रामायण सत्संग सोहळा,या ऐतिहासिक क्षणाचे भागिदार बना-परमपूज्य महान तपास्वी संत श्री योगानंद बापू



तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
येथून जवळच असलेल्या दहिफळ खंदारे(ता.मंठा) येथे परमपूज्य राष्ट्रीय संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य श्री.आनंद चैतन्य महाराज,श्री हरिहर चैतन्य सेवाधाम,चैतन्य हिल्स भांबरवडी वाडी कन्नड यांचे होळी महोत्सवा निमित्त तीन दिवसीय गीता रामायण सत्संग महायज्ञ दि.11 मार्च ते 13 मार्च 2022 आयोजित करण्यात आलेला आहे. 
             या शोभायात्रेचा सुरवात यदलापुर पासून ते दहिफळ खंदारे येथील परमपूज्य महान तपस्वी योगानंद बापू यांच्या योगीधाम येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. या यात्रेमध्ये आनंद चैतन्य महाराज व योगानंद बापू यांचे विविध गावातील नागरिकाकडून सन्मान होणार असून भाविकांना या माध्यमातून बापू कडून आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तीन दिवसीय या सत्संगामध्ये सत्संग, शोभायात्रा, दीप महोत्सव, भजन संध्या, होळी नृत्य, किर्तन आणि सर्व भाविकांचा तीन दिवसीय भोजनाचे सुद्धा नियोजन करण्यात आलेले आहे.त्याच प्रमाणे भाविकांना राहण्यासाठी येथे सुविधा सुद्धा या सत्संगाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्याचे भाग्य आपणास होणार असून या सोहळ्याला आपण सहपरिवार सह हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान योगानंद बापू सह साधक परिवार मंठा तालुका यांनी केले आहे. तसेच या धार्मिक कार्यक्रमाच्या सेवेच्या संधी साठी नवतरूणानी पुढाकार घेऊन या धर्मकार्यात सहभाग नोदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड