सचिन मगर यांचा पी.एचडी.पदवी प्राप्त केल्या बद्दल सत्कार
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सचिन किसनराव मगर यांनी नुकतिच गणित या विषयात पीच.डी.(Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन केली.
सचिन मगर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डाॅ. कीर्तीवंत घडले यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन कार्य केले. " सम काॅन्ट्रीब्युशन टू फ्रॅक्शनल डिफ्रनशियल इक्वेशन्स युजिंग इंटिग्रल ट्रान्सफाॅर्न्स " असा विषय आहे.
सचिन मगर हे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे सेवा निवृत्त कार्यालयीन अधिक्षक किसनराव मगर यांचे चिरंजीव आहेत.
सचिनच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.परतूर येथील पतंजली आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकचे डाॅ.दीपक दिरंगे यांनी त्याचा यथोचित सन्मान केला. या प्रसंगी माजी प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे आणि मित्र मंडळी उपस्थित होती.