रक्ताच्या शेवटच्या थेंबपर्यंत कार्यकर्त्यांच्या ऋणात राहील- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर,वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात आमदार लोणीकर भावुक,आमदार लोणीकर यांचा वाढदिवस जिल्हाभरात जल्लोषात साजर

प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
कार्यकर्त्यांचं अतूट प्रेम जिद्द चिकाटी या बळावरच मी सरपंच पदापासून कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहोचू शकलो एक अनमोल ठेवा असून रक्ताच्या शेवटच्या थेम्बापर्यंत कार्यकर्ताच्या ऋणात राहून जनसेवेचा वसा कायम जपण्याचा प्रयत्न करेल अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांना वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या

वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात आमदार लोणीकर भावुक झाल्याचे चित्र दिसून आले मंत्रिपदावर नसले तरी कार्यकर्त्यांनी श्री लोणीकर यांच्या वर असलेले प्रेम विविध उपक्रमांचे आयोजन करून व्यक्त केले त्यामध्ये ह भ प निवृत्ती महाराज देशमुख ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे कीर्तन कबड्डी क्रिकेट स्पर्धा कुस्ती स्पर्धा रक्तदान शिबीर पेढे तुला लाडू तुला योग शिबिर वेद शाळेतील मुलांसाठी अन्नधान्य वाटप अशा वेगवेगळ्या माध्यमातून जालना जिल्हा बरोबरच परभणी जिल्ह्यात देखील लोणीकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला

लोणीकर यांचा वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद सदस्य हरिरामजी माने शहाजी राक्षे शिवाजी भेंडाळकर यांच्या वतीने भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती त्यासाठी महाराष्ट्रभरातून आनंदात सहभागी झाले होते 11 लक्ष रुपयांची बक्षिसे या स्पर्धेमध्ये वाटप करण्यात आले आष्टी येथे तुकाराम सोळंके यांच्या वतीने ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले होते या समारंभामध्ये श्री लोणीकर यांना छत्रपती गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रसंगी उपस्थित सर्व कीर्तन श्रोत्यांना सोळंके यांच्या वतीने स्नेहभोजन व्यवस्था करण्यात आली होती

भाजयुमोचे जालना जिल्हा महामंत्री संपत टकले यांच्यावतीने ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते तर बद्रीनारायण ढवळे यांनी श्री लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन आयोजित केले होते डॉ शरद पालवे यांच्या वतीने दोन हजार पेक्षा अधिक लोकांना सोय होईल अशा स्वरूपाचे सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या शिबिरासाठी डॉ हुसे डॉ कोरडे डॉ राठोड यांच्यासह अनेक नामवंत डॉक्टर या शिबिरात उपस्थित रुग्णांना तपासणीसाठी उपलब्ध होते

तळणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते तर डॉ पोकळे यांनी नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होत वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला असून वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम आयोजित केल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात श्री लोणकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे भाजयुमो परतुर तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी साईबाबा मंदिर परिसरात श्री लोणीकर यांची शर्करा तुला केली तर जयपुर सर्कल भारतीय जनता पार्टीच्या वतीने वैद्य वडगाव येथे योग शिबिर सप्ताह आयोजित करण्यात आला आहे तर देवगाव खवणे येथील सरपंच संदीप मोरे यांच्यावतीने ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे हरी किर्तन आयोजित करण्यात आले

सेवली येथे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे हरिकीर्तन जालना जिल्हा उपाध्यक्ष तथा पिंपळवाडी चे सरपंच विकास पालवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते शेवली येथील इंदुरीकर यांच्या कीर्तनासाठी २० हजारांपेक्षा अधिक जनसमुदाय पंचक्रोशीत उपस्थित होता यावेळी ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी देहू येथे झालेल्या गाथा पारायण सोहळ्यातील लोणीकर यांच्या कामगिरीची आठवण करून देत लोणीकर यांनी मतदारसंघात सर्व महाराष्ट्रभर केलेल्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं तर जिल्हा परिषदेचे सदस्य पंजाबराव बोराडे यांनी सामाजिक उत्तरदायित्व निभावत श्री लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धनगर समाजातील गरीब मुलीचा स्वखर्चातून विवाह सोहळा आयोजित केला प्रसंगी नगर भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती

श्री सागर बर्दापूरकर यांच्या वतीने श्री लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेधशाळेतील मुलांसाठी धान्य वाटप करण्यात आले यावेळी वेदपाठ शाळेतील गुरुजन व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामनगर येथे श्री लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा सहदेव मोरे पाटील नारायण मगर व विलास भुतेकर यांच्या वतीने पेढे तुला करण्यात आली तर कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा ची माजी संचालक ज्ञानेश्वर माऊली वायाळ यांनी लोणीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परिसरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण आ बरोबरच लोणीकर यांची लाडू तुला व नगर भोजन कार्यक्रम आयोजित केला

==========================
श्री लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सेवली ते आष्टी १०० किमी भव्य मोटर सायकल रॅली

श्री लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त मतदारसंघातील युवा कार्यकर्त्यांनी शेवली ते आष्टी १०० किलोमीटर अंतराची भव्य मोटारसायकल रॅली आयोजित केली होती त्यामध्ये तब्बल ०२ हजार पेक्षा अधिक मोटरसायकल सहभागी झाल्या होत्या. मोटरसायकल रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला यावेळी फटाक्यांची मोठ्याप्रमाणात आतिषबाजी करण्यात आली स्वतः लोणीकर यांनी बुलेट वर बसून रॅलीत आपला सहभाग नोंदवून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला

आष्टी येथे श्री खंडेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी वाढदिवसानिमित्त आयोजित मोटर सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला प्रसंगी श्री लोणीकर यांच्या हस्ते श्री खंडेश्वर यांची महाआरती करण्यात आली यावेळी भाजयुमो प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर रामराव लावणीकर ह भ प रमेश महाराज वाघ डॉ संजय रोडगे गणेश खवणे ज्ञानेश्वर शेजुळ रमेश भापकर सतीश निरवळ प्रकाश टकले विलास आकात भगवानराव मोरे परभणी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ देशमुख भाजपा जालना जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य अवधूत नाना खडके जिल्हा परिषद सदस्य जीवन वगरे जिजाबाई जाधव रंगनाथ येवले रामप्रसाद थोरात बीडी पवार नागेश घारे विठ्ठल मामा काळे दत्ता कांगणे अशोक डोके दिलीप पवार रामेश्वर तनपुरे प्रदीप ढवळे रोहन आकात सिद्धेश्वर सोळंके सुभाष राठोड विलास घोडके रवी सोळंके माऊली सोळंके गजानन लिपणे जितू अंबुरे सुधाकर सातोनकर संदीप बाहेकर गणेश पवार प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे नितीन जोगदंड रमेश आढाव गजानन लोणीकर राजेंद्र वायाळ गजानन उफाड विक्रम उफाड अविनाश राठोड नरसिंग राठोड अशोक वायाळ बाबाराव थोरात बबलू सातपुते अमोल जोशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले