परतुर मंठा परिसरात बोर्ड परिक्षा सुरुळीत
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
आतापर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे आठ हजार ३०० परीक्षा केंद्रे होती. नव्या निर्णयानुसार परीक्षा केंद्रांत वाढ होऊन ती ३१ हजारांवर झाली.परीक्षा कक्षात गर्दी होऊ नये; म्हणून एका परीक्षा कक्षात २५ विद्यार्थ्यांची परीक्षेची सोय करण्यात आली.
विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था झिगझॅग पद्धतीने करण्यात येईल, असे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले होते.
परिक्षा मंडळाच्या गाईडलाईन्सनुसार परतुर मंठा परिसरातील सर्वच केंद्रांवर बारावी परिक्षेच्या संदर्भात संबंधित केंद्राकडुन जय्यत तयारी करण्यात आली.
विद्यार्थ्यांना पुरेपूर सुविधा मिळतील यासाठी सर्वच केंद्रांनी प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
पोलिस प्रशासन,केंद्र व्यवस्थापन या सर्वांच्या नियोजनाखाली बारावी परीक्षा सुरळीत पार पडत आसल्याचे चित्र दिसत आहे.