न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

परतूर तालुक्यातील संकनपूरी येथे नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू.. गावावर शोककळा पसरली आहे.

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतूर तालुक्यातील संकनपुरी येथील नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. संकनपुरी येथील उमेश बाबासाहेब नाचण वय 11 वर्ष करण बाळासाहेब रघुनाथ नाचण वय 13 वर्ष हे तिघेजण शाळा सुटल्यावर गावाजवळ असलेल्या नदीच्या ओढ्यावर पाहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यान पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला तर गावात व पंचक्रोशीत सोककळा पसरली असून सर्व नागरिक दुःख व हळहळ व्यक्त करत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत आष्टी पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाही.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत