हिंदुत्वाची गुढी उभारण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा -सिध्देश्वर काकडे
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या च्या वतीने गुढीपाडवा सण उत्साहात साजरा केला जातो. याच धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संस्थापक अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या वर्षी २ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी सांगितले आहे.
या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाची दिशा आणि पक्षाची पुढील भुमिका मनसे संस्थापक अध्यक्ष श्री. राज ठाकरे जाहीर करतील आशी शक्यता आसल्याचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला आता अमित ठाकरे यांच्या रुपानं अध्यक्षपद मिळाल्याने राज्यातील तरुणाई मध्ये ऊत्साही वातावरण आसल्याचे सिध्देश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. या गुढीपाडवा मेळाव्याला मराठवाड्यातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असुन हिंदुत्वाची सर्वात मोठी गुढी उभारण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा आसे अहवान मनसे विद्यार्थी सेनेचे सिध्देश्वर काकडे यांनी केले आहे.