जीवनात जर यशाचा शिखर गाठायचा असेल तर कठोर मेहनती शिवाय पर्याय नाही -संतोष साबळे

परतूर दि 11 प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
जीवनात जर यशाचा शिखर गाठायचा असेल तर कठोर मेहनती शिवाय पर्याय नाही असे उदगार परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयातील इयत्ता 10 वि च्या मुलींच्या निरोप। समारंभात गटशिक्षण अधिकारी संतोष साबळे यांनी काढले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक संजय जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख नामदेव धुमाळ,आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक कल्याण बागल, श्रीमती विशाखा जोशी, आगार प्रमुख दिगंबर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती..
    या वेळी पुढे बोलताना श्री साबळे म्हणाले की, आज चे युग स्पर्धेचे आहे या युगात जो कठोर परिश्रम करेल तोच टिकेल . तसेच जिल्हा परिषद च्या वतीने देण्यात येणार आदर्श शिक्षक पुरस्कार 2021-22 कल्याण बागल यांना मिळाल्या बद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी इयत्ता 10 वि च्या विद्यार्थ्यांनीने आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शाम कबडी, तुकाराम जईद, रामराव घुगे,श्री कदम,रामप्रसाद नवल,अनिल काळे,सचिन कांगने,स्वरा राखे,वृन्दा डक,योगेश बरीदे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी- आदर्श शिक्षक कल्याण बागल यांचा सत्कार करताना विद्यालयातील शिक्षक दिसत आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....