सुलोचना आठवे यांचे निधन
परतूर,प्रतिनिधी हनुमंत दवंडे
येथील देशपांडे गल्लीतील जेष्ठ नागरिक श्रीमती सुलोचना श्रीधरराव आठवे यांचे शनिवारी (दि.२६) वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ८१ वर्षांच्या होत्या.
संत कालिदास संस्कृत साधना पुरस्काराचे मानकरी वेशास स्व.श्रीधरगुरू आठवे यांच्या त्या पत्नी होत्या.
त्यांच्या पार्थिवावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात्य एक मुलगा,दोन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे.
जिल्हा परिषद प्रशालेचे आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक देविदास आठवे त्यांचे चिरंजीव होत.