दैठणा फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताहास उद्या पासून सुरुवात
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
तालुक्यातील दैठणा फाटा येथे प.पू ब्रम्हनिष्ठ गुरु गंगाभारती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहास आज पासून सुरुवात होऊन दि. ९ ते १५ मार्च दरम्यान दैनदिन
कार्यक्रम, भागवत कथा तसेच नामवंत किर्तनकार या सोहळ्यात कीर्तन प्रवचन होणार असल्याची माहिती पंच कमिटीने दिली आहे.
दैठणा फाटा येथे होणार्या अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, गाथा भजन, हरिपाठ, रात्री साडेआठ ते साडेदहा हरी कीर्तन व जागर आयोजन करण्यात आले आहे.
दि ९ मार्च पासून या सप्ताहास उत्साहात प्रारंभ होत आहे. या सप्ताहात पहिल्या दिवशी हभप योगेश महाराज आकात सातोना यांचे रात्री कीर्तन होणार आहे. तर दुसर्या दिवशी वारकरी भूषण दत्ता महाराज सिंगोनकर, हभप शीतलताई साबळे अहमदनगर, हभप कृष्णा महाराज शिंदे शहापूरकर, हभप ज्ञानेश्वर महाराज कोठूळे मुंबई, हभप भगवताचा-र्य रूपालीताई सवने महाराज, तर दि १५ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता काल्याचे कीर्तन हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे होणार आहे. या सप्ताहात भागवत कथा सकाळी १० ते २ वाजे पर्यंत आयोजन संपत भानूदासराव टकले यांनी केले आहे. भागवत कथा प्रवक्ते भागवताचा-र्य हभप नामदेव महाराज शास्त्री शिळवणीकर यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न होणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहा निमित्ताने होणाऱ्या कीर्तन व भागवत श्रवणचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचकमिटी दैठणा खु. व बु. यांनी केले आहे.